संतोष पवार यांच्या नावे परिषदेचा पुरस्कार

0
377

स्व. संतोष पवार यांच्या नावे परिषदेचा पुरस्कार
उत्तम कार्य करणारया जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना “संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प़सिध्दी प़मुख” पुरस्काराने सन्मानित करणार

मुंबई दि. ५: सर्वोत्कृष्ट काम करणारया जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना मराठी पत्रकार परिषदेचे दिवंगत सरचिटणीस संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प़सिध्दी प़मुख” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज केली..दरवर्षी ३ डिसेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या वर्धापन दिनी या पुरस्काराची घोषणा करण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले..
मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील प्रत्येक जिल्हयात एक प्रसिद्धी प्रमुख नियुक्त केला आहे.. या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची महत्वाची ऑनलाईन बैठक आज पार पडली.. बैठकीत एस.एम.देशमुख यांनी ही घोषणा केली.. परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले..
परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, मात्र या उपक्रमांना योग्य प़सिध्दी मिळत नसल्याने त्याची माहिती जनता आणि सर्व सामांन्य पत्रकारांपर्यत पोहोचत नाही..परिषदेच्या आणि जिल्हा संघांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी प़सिध्दी प्रमुखांनी प़यत्न करावेत अशी सूचना किरण नाईक यांनी केली.. त्यासाठी सोशल मिडियाचा जास्तीत जास्त वापर केला जावा अशा सूचना त्यांनी केल्या.. .. प्रत्येक जिल्हयात जिल्हा संघाचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप असावा आणि त्यावर परिषदेच्या पदाधिकारयांना घेतले जावे असे अध्यक्ष गजानन नाईक यांनी स्पष्ट केले.. ..
जिल्हा पत्रकार संघ आणि परिषद यांच्यातील महत्वाचा दुवा या भूमिकेतून जिल्हा प़सिध्दी प्रमुखांनी काम करावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले.
परिषदेच्यावतीने सर्व जिल्हा प़मुख, विभागीय सचिव, उपाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारयांना लवकरच ओळखपत्रं दिली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले..
बैठकीस राज्यातील २९ जिल्ह्याचे प़सिध्दी प्रमुख उपस्थित होते..
पूरग्रस्त भागातील जनतेला मदत व्हावी यासाठी विविध जिल्हा संघांनी विशेष प़यत्न केले, महाड आणि पोलादपूर मधील पूरग्रस्त पत्रकारांना रायगडच्या पत्रकारांनी मदत केली त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी सर्व जिल्हा संघांना धन्यवाद दिले आहेत.. .
कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सर्वांचे आभार मानले..

संतोष पवार यांचा अल्प परिचय
संतोष पवार हे माथेरानचे सकाळचे प़तिनिधी होते.. त्यांचं स्वतःचे महाराष्ट्र माझा नावाचे चॅनल आहे.. रायगड प़ेस क्लबचे अध्यक्ष राहिलेल्या संतोष पवार यांनी परिषदेचे कोकण विभागीय चिटणीस आणि मग परिषदेचे सरचिटणीस म्हणून काम केले.. राज्य अधिस्वीकृती समितीवरही त्यांनी परिषदेचे प़तिनिधी म्हणून काम केले होते.. परिषद भक्कम व्हावी यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे..चांगले संघटक असलेल्या संतोष पवार यांना कोरोना झाल्यानंतर ऑक्सीजन न मिळाल्याने काही क्षणातच त्यांचे निधन झाले.. त्यांचे योगदान परिषद विसरू शकत नाही.. त्यामुळेच त्यांचे कायम स्मरण राहावे यासाठी परिषदेने संतोष पवार यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here