सुहास खामकर अडकला

0
769

जागतिक कीर्तीचा शरीऱसौष्ठवपटू आणि छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू,पनवेल येथील नायब तहसिलदार सुहास खामकर याला थोड्या वेळापुर्वी 50 हजाराची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून त्याला ताब्यात घेतल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सातबाराच्या उताऱ्यावर नाव टाकण्यासाठी एका शेतकऱ्यांकडं सुहास खामकरने 60 हजार रूपयांची मागणी केली होती.अखेरीस 50 हजार रूपयांवर ही तडजोड झाली. त्यानंतर .संबंधित शेतकऱ्याने याची तकार रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडं केली.आज सायंकाळी पाचच्या सुमारास पनवेल येथे खामकरचा सहाय्यक गणेश भोगाडे 50 हजारांची ही लाच घेताना रंगेहात पकडला गेला.
सुहास खामकरला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.9 वेळा मिस्टर इंडिया होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.खामकर पकडल ा गेल्याने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here