रायगड जिल्हयातील सावित्री नदीवरील दुर्घटनाग्रस्त पुलाच्या जागी नवीन तीन पदरी पूल उभारण्याच्या कामास आरंभ झाला असून 13 कोटी रूपये खर्च करून तेथे अद्ययावत पूल उभारला जात आहे.नवीन पुलाची रचना करताना भूकंप,अतिवृष्टी,किंवा महापुरातही हा पूल भक्कम राहिल अशी व्यवस्था केली जात आहे.पुलाचे काम नऊ महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.
2 ऑगस्ट रोजी सावित्रीला आलेल्या महापुरात ब्रिटिशकालिन पुल वाहून गेला होता.त्यात दोन एस.टी .बस आणि एक तवेरा जीप वाहून गेल्याने 40 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या दुर्घटनेनंतर पर्यायी पूल उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.त्यानुसार आता पूल उभारणीचे काम वेगात सुरू झाले आहे.–