अलिबागः सर्व आघाडयांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला चले जाव असे सांगण्याची हीच वेळ असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केले आहे.
रायगड जिल्हयातील महाड येथे आयोजित जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाम,विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात 12 हजारांवर शेतकर्‍यानी आत्महत्त्या केलेल्या असल्या तरी सरकारला त्याचं काहीच वाटत नसल्याचा आरोप करून अशोक चव्हाण म्हणाले सरकारची कर्जमाफी ही फसवी आहे.अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मोहन प्रकाश यांनी भाजप सरकारच्या काळात जगणे कठीण मात्र मरणे स्वस्त झाल्याचा आरोप केला.
कार्यक्रमास कोकणातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here