संपादकासाठीही लागते लॉबिंग

0
964

 

जमाना लाॅबिंगचा आहे.ग्रामपंचायत पासून ते लोकसभे पर्यंत  तिकिट मिळविण्यासाठी  लाॅबिंग करावे लागते.शासकीय कामं करून घ्यायची असतील तरीही लाॅबिंग करीत कोणाचे तरी खिसे गरम करावे लागतात.त्यामुळं समाजात दलालांचा एक वर्ग  तयार झालाय.हे लाॅबिंगचं लोण इथंच थांबत नाही.संपादकपदासाठी देखील लाॅबिंग करावं लागतंय. हे वास्तव आता प्रकषार्नं समोर येत आहे. वाहिन्यात किंवा मोठ्या दैनिकात संपादक व्हायचं असेल तर केवळ बुध्दीमत्ता,अक्कल असून भागत नाही.( बऱ्याचदा ती नसली तरी चालते ) तर तुम्हाला तगडी लाॅबिंग मात्र करता आलीच पाहिजे.त्यासाटी मालकाचे कोणत्या राजकारण्यांशी संबंध आहेत ते अगोदर शोधावे लागते.नंतर त्या राजकारण्यापयर्त पोहोचण्याचा रस्ता धुडांळावा लागतो.नंतर शिफारस वगैरे करून संपादक हे पद पदरात पाडून घेता येते.राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आपल्या मेर्जीतले  संपादक मोक्याच्या ठिकाणी हवे असतात त्यामुळे ते अशा शिफारशी आनंदानं करताना दिसतात,मालकही राजकीय पुढाऱ्यांच्या शिफारशींना प्राधान्य देतात कारण त्यांनाही राजकीय मदतीची गरज असते.त्यातून अशा नेमणुका होऊ लागल्या आहेत.थोडक्यात संपादकाची नेमणूक आता पाॅलिटिकल अपाॅयमेंट झाल्या आहेत.

लाॅबिंगमध्ये जी मंडळी मास्टर आहे त्यांना अशा नेमणुका पदरात पाडून घेणे तुलनेत सोपे असते. ज्यांना हे जमत नाही किंवा ज्यांना कोणी गाॅडफादर नाहीत किंवा ज्यांना तडजोडी करता येत नाही  ते व्यवहारी जगात  अव्यवहारी ठरतात.स्पधेर्त मागे पडतात..मग भलेही त्यांच्याकडं कितीही गुणवत्ता असो. पत्रकारिता हा त्यांच्यासाठी पॅशन् असो ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. पत्रकारिता आता पॅशन राहिलेला नाही असं बेधडक विधानं करणारी संपादक मंडळी अनेक आहेत.  तो व्यवसायही राहिलेला नाही.तो धंदा झालाय.असे सुविचार अनेकदा व्यक्त होताना दिसतात. धंदा करताना ज्या बऱ्या वाईट गोष्टी कऱणं भाग असतं ते सारं आता इथंही करावं लागतंय.मालकांना खुष ठेवा,ज्यांच्या माफर्त आपण चिकटलोत त्याची मजीर् संपादन करा,जाहिरातदारांना नाराज करू नका,मॅनेजरशी सांभाळून वागा अशा अनेक तारेवरच्या कसरती संपादकांना कराव्या लागतात,हे सारं करता करता त्याच्यातला उरला सुरला संपादकही मरून जातो आणि उरतो तो केवळ खुर्चीचा  धनी.अशा नामधारी संपादकांची संख्या महाराष्ट्रात मोटी आहे .बाहेर तत्वाच्या गोष्टी करणारे अनेक संपादक आपल्याच आॅफिसमध्ये तत्वांची दिवसरात्र मोडतोड करीत आपली नोकरी, त्यातून मिळणारे आथिर्क लाभ आणि प्रतिष्ठा,फायदे टिकविण्याचा प्रयत्न करीत असताता.हे वास्तव किती संपादक खुल्या दिलानं मान्य करतील माहित नाही.मात्र त्यांनी मान्य केले नाही तरी हे उघड गुपित आहे आणि ते जगालाही कळलेले आहे.म्हणूनच पत्रकार जेव्हा संरक्षण कायद्याची मागणी होते  तेव्हा आर.आर.पाटील “म्हणतात पत्रकारांना खरे हल्ले त्यांच्या अाॅफिसमधूनच होतात.या हल्ल्यापासून त्यांना संरक्षण हवे आहे,त्यावर तुम्ही कोणीच बालत नाहीत”आबा जे बोलतात ते खोटे नाही.पण हा स्वखुषीनं अन्याय सहन करण्याचा मामला असेल तर कोण काय कऱणार.मजिठियाचंच बघा ना..सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही महाराष्ट्रातील एकाही दैनिकानं ( अपवाद टाइम्स ऑफ ंइंडिया ) मजिठिया लागू केलेला नाही.शिफारशीनं संपादकपद भोगणारे एकही संपादक यावर बोलत नाहीत,बोलणार नाहीत.पत्रकार संघटनांही गप्पगार आहेत.माध्यमात लाचारांची एक नवी जमात सध्या अस्तित्वात आली आहे.तत्वाच्या गोष्टी कऱणारे स्वतःची दिशाभूल करताहेत हेच सत्य आहे.( सूर्या देवडीकर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here