सरकारचीच इच्छा नाही …

0
671

साधनाचे संपादक .डाॅनरेंद्र दाभोलकर यांची दिवसा ढवळ्या हत्तया झाली या घटनेला आज एक वषर् झाले.लाजीरवाणी गोष्ट अशी की,आर.आर.पाटलांच्या शिपायांना दाभोळकरांचे मारेकरी शोधता आले नाहीत.सतीश शेट्टी असोत किंवा नरेंद्र दोभोळकर चळवळीतील ज्या ज्या कायर्कत्यार्च्या हत्तया झाल्या त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. महाराष्ट्रात ज्या ज्या पत्रकारांच्या हत्त्या झाल्या त्यांचेही मारेकरी सरकारला मिळालेले नाहीत.याचा अथर् असा की, पत्रकारिता किंवा चळवळीतील कायर्क्तायर्ंच मानसिक खच्चीकऱणा करण्यासाठी सरकार त्यांच्या मारेकऱ्यांचा कसून तपास करीतच नाही हा अनुभव आहे.या मागं चळवळी मोडीत काढण्याची सरकारची नीती असावी.चळवळीसाठी असुरक्षित वातावरण तयार करायचे,मागणी करूनही चळवळीतील कायर्कत्यार्ंना संरक्षण पुरवायचे नाही,अशा स्थितीत कोणाची हत्त्या झाली तर थंडपणे त्याचा शोध घ्यायचा ही सरकारची नीती दिसते.चळवळीतील कायर्कत्यार्ंच्या मनात भीतीचे दहशतीचे वातावरण तयार करण्याचा हा गेम प्लॅन असावा.असे नसते तर सरकारने सतीश शेट्टी किंवा नेरंद्र दभोळकर यांचे मारेकरी शोधून काढले असते.सतीश शेट्टीचे मारेकरी सापडत नाहीत म्हणून सरकारने ही फाईलच बंद केली.मारेकरी सापडत नाहीत म्हणजे नेमके काय होतंय,?ते पाताळात दडले की,आकाशात उडाले ?गेले कुठे मारेकरी.?काय झालं त्याचं.?सरकारनं त्याचं उत्तर दिलं पाहिजे.जे सतीश शेट्टी यांच्या बाबतीत झालं तेच आता दाभोळकर यांच्या बाबतीत होणार आहे.याचा सरळ अथर् एवढाच की,मारेकरी सापडावेत ही सरकारचीीच इच्छा नाही.
यातली आणखी एक महत्वाची गोष्ठ लक्षात घेतली पाहिजे.दाभोलकरांचे मारेकरी सापडावेत यासाठी सामाजिक चळवळीतील कायर्कतेर् वगळता कोणताही राजकीय पक्ष रस्तयावर उतरून आंदोलन करताना कधी दिसला नाही.महाराष्ट्राला नवा विचार देणारा एक विवेकी कायर्कतार् अत्यंत निघर्णपणे मारला जातो आणि त्याचं राज्यकत्यार्ंना आणि राजकारण्यांना काहीच वाटत नाही हे चीड आणणारे ,संतापजनक असेच आहे.दाभोळकराच्या मारेकऱ्यांचा शोध लावू न शकणाऱ्या सरकारचा आम्ही त्रिवार निषेध करीत आहोत.मात्र दाभोळकरांची हत्त्या झाली असली तरी त्यांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेली चळवळ थांबणार नाही .चळवळीतील प्रत्येक कायर्कत्यार्ला आज मीच दाभोळकर आहे असे वाटते.हा देखील सरकारचा पराभव आहे.पंधरा वीस वषेर् एकाच ध्येयाने आणि निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या दाभोळकरांची हत्या धक्कादायक होती.मात्र त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात जी उदासिनता दाखविली जात आहे ती अधिक धक्राकादायक आणि राज्य सरकारला कलंकित करणारी आहे हे नक्की.डाॅ.दाभोळकरांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन (एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here