संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश 

0
697

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळं रायगडच्या राजकाऱणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.रोहा नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी आता ते अधिकृतपणे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील.आज दुपारी मातोश्रीवर झालेल्या या कार्यक्रमात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी रायगडचे खासदार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते,आ.भरत गोगावले आदि उपस्थित होते.नंतर पत्रकारांशी बोलताना अनंत गीते यांनी कोकणातील आणखी काही आमदार शिवसेनेत दाखल होणार असल्याचे सांगितले.रायगडमधील राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे देखील गेली काही दिवस पक्षापासून दूर आहेत.त्यामुळं रायगडमध्ये राष्ट्रवादी चांगलीच अडचणीत आलेली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here