अलिबाग- एका बाजुला गेली दोन-तीन दिवस रायगड जिल्हयाच्या विविध भागात वादळीवारा आणि गारपिटीसह कोसळत असलेला पाऊस आणि दुसऱ्या बाजुला वाढत्या तापमानामुळे रायगडकर जनता त्रस्त झाली आहे.
रायगडमध्ये काल कर्जत,खोपोलीत पाऊस झाला,त्याच प्रमाणे पोलादपूरलाही पावसाने शनिवारी सायंकाळी झोडपून काढले.वादळीवारा आणि गारपीट झाल्याने पोलादपूरमधील सर्वसामांन्य जनजीवन काल विस्कळीत झाले होते.पावसाने अनेक ठिकाणी घऱांचे नुकसान झाले तर पोलादपुरात एका कारवर झाड कोसळल्याने कारचा चक्काचुर झाला.पोलादपुरात गेल्या महिनाभरात 1 मार्च,10 मार्च,26 मार्च,आणि 29 मार्च असा चार वेळा अवेऴी पाऊस झाल्याने आंबा पिक जवळपास हातचे गेले आहे.
जिल्हयाच्या काही भागात पाऊस कोसळत असला तरी जिल्हयातील सरासरी तापमानात चार दिवसात 8 सेल्सियश अंशाने वाढ झाली आहे.25 मार्च रोजी किमान तापमान 24.4 अंश सेल्सियस होते ते 28 मार्च रोजी 34.1 सेल्शियस पर्यत वाढले आहे.उकाडा तर वाढला आहेच त्याचबरोबर जिल्हयातील अनेक तलावांनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचा प्रश्नही उग्र होत चालला आहे.