वाहिन्या आणि हात जोडतो थोडं थांबा …

0
1010

टाइम्स नाऊ किंवा तत्सम इग्रजी किंवा हिंदी वाहिन्यांवर अनेकदा गरमा गरम चर्चा होताना दिसते.मात्र अँकर हतबल झालेले दिसत नाहीत.सन्माननिय वक्त्यांना कसे आवरायचे हे त्यांना ठाऊक असते.मात्र आज किमान दोन-तीन मराठी वाहिन्यांवर आंबेडकर भवनावरील चर्चेच्या वेळेस अँकर हतबल झालेले दिसले.हात जोडतो थोडं थाबा,हात जोडतो थोडं थांबा ही वाक्या आणि साक्षात हात जोडल्याचे चित्र किमान पन्नास वेळा बघायला मिळाले.एक वाहिनीवरचे संपादक तर जवळपास तासभर हात जोडलेल्या अवस्थेत होते.विषय अडचणीचा होता की,अँकरला वक्त्यांची भिती वाटत होती ते समजत नव्हते.इंग्रजी किंवा हिंदी वाहिन्यांच्या तुलनेत आमच्या मराठी वाहिन्या वाहिन्यांच्या तुलनेत आमच्या मराठी वाहिन्या कोठे कमी पडतात ते आज पुन्हा एकदा समजले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here