वहाळमध्ये आडवी बाटलीच्या बाजुने कौल

0
863
पनवेल तालुक्यातील वहाळ येथील महिलांनी नो लिकर झोनच्या बाजुने मतदान करून गावातील बारला जले जावचा आदेश दिला आहे.आडवी बाटलीसाठी काल झालेल्या मतदानात  गावातील 2248 महिलांपैकी 1504 महिलांनी भाग घेतला.त्यापैकी 1311 महिलांनी गावात दारूबंदीच्या बाजुने कौल दिला आहे.
वहाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील जावळे,बामणडोंगरी,मोरावे येथील ग्रामस्थांनी 26 जानेवारी 2015 रोजी झालेल्या ग्रामसभेत नो लिकर झोनचा ठराव घेतला होता.मात्र काही दिवसांपुर्वी गावात एका बारला परवानगी मिळाली आणि आणखी 19 बारला परवाने मिळण्याची शक्यता होती.त्यामुळे  परिसरात अस्वस्थतः होती.त्या विरोधात मोर्चाही काढला गेला होता.त्यानंतर महिलांनी मतदानाची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.त्यानुसार काल मतदान झाले आणि बहुसंख्य महिलांनी आडवी बाटलीच्या बाजुने मतदान केल्याने आता गावात बारला बंदी केली जाईल अशी शक्यता आहे.खारघरमध्ये यापुर्वीच दारूबंदी केली गेलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here