लाचखोरांच्या विरोधात धडक मोहिम

0
742

रायगड जिल्हयात गेल्या तीन दिवसात तीन शासकीय अधिकारी,कर्मचा़ऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने गेल्या वर्षभऱात जिल्हयात पकडलल्या गेलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या तब्बल 26 वर पोहोचली आहे.लाचलुचपत विभागाचे रायगडचे उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात धडक मोहिम उघडल्यानं सर्वसामांन्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
पनवेल येथील सार्वजनिक बाधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता बुधेश रंगारी ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 73 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला.त्यानंतर त्याच्या पनवेल येथील फ्लॅटची झडती घेतली असता तेथे 1 कोटी 28 लाखांची रोकड मिळाली आहे.बेलापुरातील एका बॅकेच्या लॉकरला लाचलुचपत विभागाने सिल ठोकले असून त्याला 6 नोव्हेबरपर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे.
दुसऱ्या प्रकरणात पेण तहसिल कार्यालयातील लिपिक अमर ठमकेला वडखळ येथील शेतजमिन बिनशेती कऱण्यासाठी 8 हजाराची लाच घेताना सोमवारी रंगेहात पकडले गेले.त्यालाही 6 नोव्हेंबरपर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे.या प्रकरणात पेणच्या तहसिलदार सुकेशिनी पगारे यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती रायगडच्या लाचलुचपत विभागाने दिली.
तिसऱ्या प्रकरणात अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील तलाठी जनार्दन हाले याला सातबाराच्या नोंदीसाठी 15 हजाराची लाच घेताना मंगळवारी पकडण्यात आले.त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
लाचलुचपत विभाग सध्या दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करीत आहे.याच काळात जिल्हयात तीन सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना पकडले गेल्याने जिल्हयातील लाचखोर अधिकारी,कर्मचाऱ्यांचे धाबे दणालले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here