रोह्यात डोंगर पेटले

0
1037
रोहा तालुक्यात गेली आठ दिवस सतत डोंगरांना लागत असलेल्या वणव्याने मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक होत आहे.त्याच बरोबर या परिसरात असलेले मोर,पोपट,साळिंदर,ससे,भेकर,रानडुकरे आदि पक्षी आणि प्राणी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.डोंगरांना लागत असलेल्या वणव्यामुळे वरकस भागात लागवड केलेल्या आंबा,काजू आदि फळबागांची आणि शेतीचीही मोठ्‌या प्रमाणावर हानी होत आहे.त्या मुळे शेतकरी चिंतेत आहेत.डोंगरांना लागणाऱ्या आगी मुळे होणारे नुकसान भरपाई देण्याची कोणतीही तरतूद वनखात्याकडे नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत.
कळसगिरी,हनुमान टेकडी,खांब,सुकेळी आणि चनेरा आदि भागात हे वणवे लागत आहेत.खांब य़ेथील पर्वतरांगा तर सतत आठ दिवस धुमसत आहेत.सुकेळी येथील आगीची तीव्रताही प्रंचंड असल्याने आग विझवायला जायलाही कोणी तयार नाही.काही दिवसांपुर्वीच तळे परिसरात आगीने एका वृध्दाचा बळी घेतला आहे.दिसभर धुराचे लोट आणि रात्री पेटलेले डोंगर पहातच मुंबई-गोवा महामागावरून प्रवास करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here