रोह्यात अवधूत तटकरेंविरोधात बंड

0
909

अलिबाग- रोहा नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीवर सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या 13 नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने काल रोहा पालिकेची बैठक गणपुर्ती अभावी होऊ शकली नाही.राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात असून या निमित्तानं जिल्हयातील राष्ट्रवादीमधील नाराजी उघडपणे समोर आली आङे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे असलेले रोहयाचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांनी आपण विधानसभेवर विजयी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र ते त्यांनी न पाळल्याने रोहा राष्ट्रवादीत नाराजी आहे.त्यामुळे काल झालेल्या बैठकीस बहुसंख्य नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने महत्वाची अर्थसंकल्पाची सभाच झाली नाही.
रोहा नगरपालिकेत सतरा नगरसेवक असून त्यापैकी केवळ चारच नगरसेवक बैठकीस उपस्थित होते.रोहा पालिकेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे.या विषयावर आता सुनील तटकरे कसा तोडगा काढतात याकडे जिल्हयाचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here