रोह्याचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांचा राजीनामा

0
633
रोह्याचे नगराध्यक्ष आमदार अवधूत तटकरे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा काल उशिरा  जिल्हाधिकारी शीतल तेली -उगले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.अवधूत तटकरे यांची नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभेवर निवड झाली होती.आमदार झाल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षपद सोडण्याचे जाहीर केले होते.मात्र त्यांनी नगराध्यक्षपद सोडले नसल्याने मध्यंतरी एकदा त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्याचाही प्रयत्न झाला होता.परंतू तो अविश्‍वास बारगळला होता.त्यानंतर आता पुन्हा अवधूत तटकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी नगरसेवकांनी दबाव वाढविला होता.त्यानुसार त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.रोहा नगरपालिका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ताब्यात असून स्वपक्षातील नगरसेवकांनीच राजीनाम्यासाठी दबाव आणल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.आता पुढील नगराध्यक्ष कोण असेल याची चर्चा सध्या रोह्यात सुरू आहे. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here