रेवस-करंजा रो रो सेवा सुरू होणार 

0
783
मुंबई-गोवा महामार्गावरील जिवघेण्या प्रवासाला पर्याय ठरू शकणारी रेवस – करंजा रो रो सेवा येत्या काही दिवसात सुरू होत असल्याने  नवी मुंबई- अलिबाग हे अंतर तब्बल 46 किलो मिटरने कमी होणार आहे.या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने दहा कोटीचा निधी मंजूर केला असून ब्रेक वॉटर बंधारे बांधण्याचे कामही सुरू झाले आहे.सध्या रेवस-करंजी फेरीबोट सेवा सुरू असली तरी ही सेवा अतिशय धोकादायक आहे.रो रो सेवेमुळे ही सेवा सुरक्षित होणार आहे.मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावरही रो रो सेवा सुरू होत असल्याने येत्या काही दिवसात अलिबागचा पर्यटन व्यवसाय चांगला बहरणार आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here