अलिबाग-रायगड विकासाच्यादृृष्टीने मैलाचा दगड ठऱणाऱ्या रेवस -करंजा नियोजन पूल रद्द केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा रायगड कॉग्रेसने दिला आहे.बॅरिस्टर ए.आर.अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी रेवस-करंजा पुलाची मुहूर्तमेढ रोवली होती.मात्र त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर या पुलाचे काम रेंगाळले होते.मात्र आघाडी सरकारच्या काळात पुलाच्या कामास गती येत होती.एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात देखील पुलाच्या कामासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.मात्र आता करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्सच्या रेवस-आवऱे खाजगी बंदरासाठी अलिबाग आणि उरणला जोडणाऱ्या या रेवस-करंजा पुलाची योजनाच गुंडाळण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याच्या आरोप कॉग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकरू यांनी केला आहे.त्यांनी या संदर्भात नुकतीच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविण्याची विनंती केली आहे.