राष्ट्रवादीचे सामने कॉग्रेसने उधळले

0
716
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांचं कवीत्व संपलेले नसून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी कॉग्रेसचे भाई जगताप यांना पराभूत कऱण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित क्रिकेटचे सामने कॉग्रेस कार्यकर्त्यानी उधळून लावले.आम्ही सुनील तटकरे याना सर्वच निवडणुकीत मदत केली पण सुनील तटकरेंनी नेहमीच दगाफटका केला,मागच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने अलिबागमध्ये आपला उमेदवार उभा करून कॉग्रेसला अपशकून केल्याचा आरोपही कॉग्रेसच्या कार्यकतर्यनी केला आहे.सुनील तटकरेंच्या अलिबागमध्ये होणार्‍या कोणत्याही कार्यक्रमास आम्ही निदर्शने करू असा इशाराही कॉग्रेसने दिला आहे.रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी -शेकाप युती असल्याचाही कॉग्रेसच्या मनात राग आहे.या प्रकाराने बाहेर गावाहून आलेल्या खेळाडूंची निराशा झाली.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here