गणरायांना निरोप 

गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या चा आग्रह करीत काल रायगड जिल्हयातील 17 हजार 16 खासगी आणि 150 सार्वजनिक गणरायांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.टाळ,मृदुंगाच्या गजरात आणि बाप्पा मोरयाचा जयघोष करीत अत्यंत आनंदी वातावरणात गणरायाच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या.ठिकठिकाणी नगरपालिकांनी गणरायांच्या विसर्जनाची चोख व्यवस्था केली होती.यंदा रायगड पोलिसांच्या हद्दीत 99हजार 360 खासगी आणि 268 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना कऱण्यात आली होती.त्यातील 24 हजार 861 गणपतींना दीड दिवसानं निरोप देण्यात आला.तसेच पाचव्या दिवशी,सातव्या दिवशी देखील काही गणरायांना निरोप दिला गेला.गणपती उत्साहामुळं रायगड जिल्हयातील वातावरण गेली दहा दिवस भक्तीमय झाले होते.जिल्हयात ठिकठिकाणी विविध धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.या गणेशोत्सवातून जिल्हयात सामाजिक ऐकोपा आणि परस्पर बंधुभावाची जपवणूक केली गेली.मात्र पाऊस नसल्यानं एक चिंतेची किनार गणेशोत्सवाला होती.

121 ग्रामपंचायतीसाठी रायगडात परवा मतदान 

रायगड जिल्हयातील 121 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी बुधवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी  मतदान होत असल्यानं जिल्हयातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.सरपंच आणि सदस्याच्या 1178 जागांसाठी मतदान मतदान होणार होते. त्यासाठी 2 हजार 462 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.मात्र छाननीनंतर  493 जागा बिनविरोध झाल्यानं आता 685 जागांसाठी मतदान होत आहे.यावेळेस 121 पैकी 22 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.येत्या 26 तारखेला मतदान होणार असून 27 तारखेला म्हणजे गुरूवारी मतमोजणी होणार आहे.निवडणुकांत कॉग्रेस,शेकाप,राष्ट्रवादी,भाजप,शिवसेनेनेसह स्थानिक आघाडया निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत.या निवडणुकांकडं आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांची जनमत चाचणी या भूमिकेतून पाहिले जात असल्याने सर्वच पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे.

पाऊस नाही,भातावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत

रायगड जिल्हयातील भातपीक पोटरी ते फुलोरा या अवस्थेत असतानाच पावसानं मारलेली दडी आणि करपा आणि खोडकिडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यानं \करी चिंतातूर झालेला आहे.वाढते उन आणि आर्द्रतेचे प्रमाण यामुळं वरकस आणि उतार जमिनीत हळव्या भातपिकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.हळव्या जातीच्या पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव होण्याची भिती देखील शेतकरी व्यक्त करीत आहेत.भूंग्यांचा देखील काही ठिकाणी प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी येत आहेत.विविध प्रकारच्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी तज्ज्ञ व्यक्ती आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार योग्य त्या आौषधांची फवारणी करण्याची गरज असल्याचं सांगितलं जातंय.गेली काही दिवस पावसानं दडी मारली असली तरी रायगड जिल्हयात 93 टक्के पाऊस झाल्याचा दावा केला जात आहे.सर्वाधिक म्हणजे 157 टक्के पाऊस माथेरानमध्ये तर सर्वात कमी म्हणजे सरासरी 48 टक्के पाऊस पाली-सुधागडमध्ये झाला आहे.

ग्रंथालय कर्मचार्‍यांचे  अलिबागेत धरणे आंदोलन 

सार्वनिक ग्रंथालयाच्या समस्यांकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय संघ आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने अलिबागेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी केलं.वेळोवेळी आश्‍वासनं देऊनही गेल्या चार वर्षात सरकारनं ग्रंथालय कर्मचार्‍यांची एकही मागणी मान्य केली नाही.शासनाने निश्‍चित केलेल्या किमान वेतन कायद्यानुसार देखील सार्वजनिक वाचनालयातील कर्मचार्‍यांना वेतन दिले जात नाही.महामार्ग निर्देशांकात वाढ होणे अपेक्षित असताना देखील सरकार त्याकडं लक्ष देत नसल्याबद्दल नागेश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली.ग्रंथालयाच्या परिरक्षण अनुदानात तातडीने वाढ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.रायगड जिल्हयातील ग्रंथाल कर्मचारी आंदोलनात मोठया संख्येनं सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here