रायगड लोकसभा मतदार संघ पूर्वीचे नाव — कुलाबा
रायगडचे आजपर्यतचे खासदार
1952 – सी.डी.देशमुख ( कॉग्रेस विजयी ) राजाराम राऊत ( पराभूत -शेकाप)
1957 – राजाराम राऊत ( शेकाप विजयी) दत्तात्रय कुंटे ( पराभूत – कॉग्रेस )
1962 – भास्कर दिघे ( कॉग्रेस विजयी ) राजाराम राऊत ( पराभूत -शेकाप)
1967 – दत्तात्रय कुंटे (शेकाप विजयी ) वसंत शिंदे ( पराभूत – शेकाप)
1971 – शंकर सावंत ( कॉग्रेस विजयी ) दत्ता पाटील ( पराभूत ः शेकाप )
1977 – दि.बा.पाटील ( शेकाप विजयी ) शंकर सावंत ( पराभूत कॉग्रेस )
1980 – ए.टी पाटील ( कॉग्रेस विजयी) दि.बा.पाटील ( पराभूत- शेकाप )
1984 – दि.बा.पाटील ( शेकाप विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत कॉग्रेस )
1989 – अ.र.अंतुले (कॉग्रेस विजयी) दि.बा..पाटील ( पराभूत शेकाप )
1991 – अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी ) दत्ता पाटील ( पराभूत शेकाप )
1996 – अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी) अनंत तरे ( पराभूत शिवसेना
1998 – राम ठाकूर ( शेकाप -विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत कॉग्रेस)
1999- राम ठाकूर ( शेकाप -विजयी) दि.बा.पाटील ( पराभूत सेना)
2004 -अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी) विवेक पाटील ( पराभूत शेकाप)
2009 -अनंत गीते ( शिवसेना विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत-कॉग्रेस
——————————
2009च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना 4 लाख 31 हजार 546 म्हणजे 53.89 टक्के मते मिळाली आणि ते विजयी झाले.
कॉग्रेसचे अ.र.अंतुले यांना 2 लाख 67 हजार 25 म्हणजे 34.80 टक्के मते मिळाली आणि ते 1 लाख 46 हजार 521 मतांनी पराभूत झाले.अंतुले यांनी सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा रायगडचे राजधानीत प्रतिनिधीत्व केले.
2009 मध्ये पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदार संघाचे नामांतर झाले.रायगड हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला.हा नवा मतदार संघ अस्तित्वात येत असतानाच जिल्हा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेला.
1 ) रायगड
2) मावळ
रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्हयातील पेण,अलिबाग,श्रीवर्धन ,महाड हे चार विधानसभा मतदार संघ आणि रत्नागिरी जिल्हयातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ जोडण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघात – रायगड जिल्हयातील पनवेल,उरण आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदार संघ तसेच पुणे जिल्हयातील मावळ आणि पिंपरी-चिंचवड हे विधानसभा मतदार संघ जोडले गेले.2009च्या निवडणुका नव्या मतदार संघानुसारच झाल्या.
—————————————————
विधानसभा मतदार संघनिहाय रायगड जिल्हयातील 2014च्या निवडणुकांसाठी
मतदार यादी 30 जानेवारी राजी प्रसिध्द केली गेली.त्यानुसार जिल्हयात एकूण 18 लाख 70 हजार 637 मतदार आहेत.2009च्या तुलनेत ही संख्या जवळपास दीड लाखांनी जास्त आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय मतु दार संख्या
188 – पनवेल – 3,53,988 नवे मत दार —1,59,626
189 – कर्जत – 233,950
190- उरण – 2,44,353
191- पेण – 2,76,703
192 – अलिबाग – 2,70,023,
193 -श्रीवर्धन – 2,33,412
194 – महाड – 2,58,208
——————
18,70,637
——————–
राजकीय स्थिती
———–
रायगड जिल्हयात शेकाप आणि कॉग्रेस यांच्यात अगदी 1952 पासून तुल्यबळ लढती झालेल्या आहेत.रायगडच्या मतदारांनी आलटून-पालटून कधी शेकापला तर कधी का्रग्रेसला लोकसभेत जाण्याची संधी दिली.मात्र 1989,1991,1996 अशी तीन वेळा अं.र.अंतुले यांनी निवडणूक जिंकून ही परंपरा खंडित केली.मात्र या तिन्ही वेळेस अंतुलेंचे मताधिक्य क्रमशः कमी होत गेले आणि ते 1998 मध्ये शेकापच्या नवख्या राम ठाकूर यांनी अंतुलेचा 9126 मतांनी पराभव केला.मात्र 1998 ची लोकसभा अत्पजिवी ठरली.वाजपेयी सरकार कोसळल्यावर पुन्हा 1999 मध्ये निवडणुका झाल्या मात्र यावेळेस अंतुलेंनी आपला परंपरागत मतदार संघ सोडून थेट औरंगाबाद गाठले.तेथेही त्यांचा पराभव झाला.अंतुले नसल्याने 99 चा सामना शेकाप विरूध्द शिवसेना असा झाला.शेकापतून शिवसेनेत गेलेले दि.बा.पाटील असा झाला त्यात दि.बा.पाटील यांचा पराभव झाला.
2004 मध्ये अंतुले पुन्हा रायगडात आले.यावेळी राम ठाकूर यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिल्याने शेकापने विवेक पाटील यांना उभे केले.या लढाईत शेकापचा पराभव झाला.अ.र.अंतुले विजयी झाले.अंतुले 2009 मध्ये पुन्हा मैदानात उभे राहिले.यावेळेस मतदार संघाची पुनर्रचना झाली होती.रायगड दोन मतदार संघात विभागला गेला होता.अंतुलेंच्या पाठिशी असणारे पनवेल,उरण,हे मतदार संघ मावळला जोडले गेले होते.रत्नागिरीतले दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ रायगडा जोडले गेले होते.रत्नागिरीत अंतुलेंचा फारसा करिष्मा नव्हता.त्याचा फटका त्यांना बसला ते मोठ्या फरकाने पराभूत झाले.शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले.शिवसेना प्रथमच रायगडमध्ये जिंकली होती.शिवसेनेने केवळ रायगडच नव्हे तर मावळवरही भगवा झेंडा फडकविला होता.तेथे गजानन बाबर हे शिवसेना नेते विजयी झाले होते.2009 मध्ये शेकापने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.जिल्हयात शेकापचे जवळपास अडिच लाख निर्णाय़क मते आहेत.ही मतं कोणाच्या पारड्यात पडतात याला जिल्हयाच्या राजकारण फार महत्व आह.
– रायगडमधील उमेदवार
———————
1) शिवसेना-भाजप युती—- अनंत गीते
2) राष्ट्रवादी -कॉग्रेस आघाडी —- सुनील तटकरे
3) शेकाप —- रमेश कदम
4) आप पार्टी —- डॉ.संजय अपरांती
———————————————–
2014च्या निवडणुकीसाठी शिवसेनेने पुन्हा अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे.
आघाडीच्या राजकारणात गेल्या वेळेस रायगड कॉग्रेसकडे होता तर मावळ राष्ट्रवादीकडे होता.यंदा कॉग्रेस ने हा मतुार संघ राष्ट्रवादीला सोडलाय.तेथून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे निवडणूक लढत आहेत.मावळ देखील राष्ट्रवादी लढणार आहे.तेथून अजून राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की झालेला नाही.
यावेळेस शेकाप शिवसेनेबरोबर नाही हा महत्वाचा मुद्दा आहे.शेकापने अगोदर आप बरोबर चाचपणी केली होती .शेकापचे जयंत पाटील अरविद केजरीवाल यांना दिल्लीत जाऊऩ भेटले होते मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे शेकापने नंतर राज ठाकरे यांच्याशी संधान बांधले होते.परंतू तिसऱ्या आघाडीची योजनाही यशस्वी झाली नसल्याने शेकापने आता स्वबळावर रायगड आणि मावळ लढण्याचे ठरविले आहे.त्यानुसार मावळमधून लक्ष्मण जगताप तर रायगडमधून चिपळूणचे राष्ट्रवादीचे माजी नेत रमेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.हे दोन्ही उमेदवार शेकापची मतं घेतील.त्यामुळे शिवसेनेला पडणारी शेकापची मत ं कमी होतील.त्याचा फटका अनंत गीते आणि मावळमधून श्रीरंग बारणे यांना बसणार आहे.आपने रायगडमधून माजी पोलिस अधिकारी संजय अपरांती यांना उमेदवारी दिली आहे.त्यांचा फार प्रभाव पडेल असे दिसत नाही.
—————————————————————– रायगडचे विद्यमान आमदार
1) अलिबाग-मुरूड- मीनाक्षी पाटील -शेकाप 2) उरण– विवेक पाटील –शेकाप 3) पेण- धैर्यशील पाटील-शेकाप4) श्रीवर्धन-म्हसळा- सुनील तटकरे -राष्ट्रवादी 5) पनवेल- प्रशांत ठाकूर – का्रग्रेस
6) कर्जत-खालापूर – सुरेश लाड – राष्ट्रवादी 7) महाड-पोलादपूर ्र– भरत गोगावले – शिवसेना
————————————————————————आयगड जिल्हा परिषदेत शेकाप-शिवसेना -आरपीआय युती सत्तेत आहे.आरपीआयच्या कविता गायकवाड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आङेत..जिल्हयातील सर्वाधिक नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.सर्वाधिक पंचायत समितीही राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहेत.सर्वाधिक आमदार मात्र शेकापचे तीन आहेत.राष्ट्रवादीचे दोन ,आणि कॉग्रेस तसेच शिवसेनेचे प्रत्येकी एक आमदार आहेत.
– रायगड जिल्हयातील नगरपालिका – 11 अलिबाग,़पेण,पनवेल,उरण,खोपोली,महाड,रोहा,कर्जत,श्रीवर्धन,मुरूड,माथेरान
– रायगड जिल्हयातील पंचायत समित्या- 15
– रायगड जिल्हयातील खेडी 1919
– रायगड जिल्हयातील शहरं 16
– रायगड मधील ग्रामपंचायती 818
-आयगडमधील जि.प.मत दार संघ 62
– विधानसभा मत दार संघ 7
–रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेकाप -शिवसेना युती आहे.मात्र शेकापने शिवसेनेबरोबर काडी मोड घेण्याचे ठरविल्याने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी- शिवसेना युती होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे आहे.
– राष्ट्रवादी- 20
– शेकाप – 19
– शिवसेना – 14
– कॉग्रेस – 7
– अपक्ष – 2
——————-
62
कविता गायकवाड ( रिपाई) या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत
चंद्रकांत कळंब ( शिवसेना) उपाध्यक्ष
———————–
– रायगडातील प्रश्न
—————-
1) रायगडात प्रकल्पग्रस्ताचे मोठे प्रश्न आहेत.नवी मुंबई विमानतळामुळे पनवेल,उरणमधील अनेक शेतकरी विस्थापित होत आहेत.त्यांचा योग्य पॅकेजसाठी लढा सुरू आहे.दिल्ली-मुंबई औध्योगिक कॉरिडोरमध्ये माणगाव,तळा,रोहा तालुक्यातील 72 गावंासमोर समस्या निर्माण झाली आहे त्याचाही प्रश्न आहे.
2) रायगडातुन कोकणात अनेक रेल्वे गाड्या जातात पण त्याचा थांबा रायगडात नाही त्यामुळे तो देखील महत्वाचा मुद्दा आहे.पेण-अलिबागच्या नवीन रेल्वेला मंजुरी मिळाली असली तरी त्याचे काम अजून सुरू झाले नाही.तो देखील महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.याशिवाय रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत.त्यांचा मावेजा मिळावा यासाठी लढा सुरू आहे.
3) मुंबई-गोवा महामर्गाचे काम पनवेल ते इंदापूर या 84 किलो मीटरच्या टप्प्यात सुरू आहे.मात्र इंदापूरच्या पुढे खेड पर्यतच्या दुसऱ्या टप्प्यासा अजून मंजुरी मिळाली नाही.रायगड मत दार संघाचा मोठा भाग रूंदीकऱणाच्या प्रक्रियेपासून दूर राहणार असल्याने तो देखील महत्वाचा मुद्ा आहे.शिवाय रस्ता रूंदीकऱणात ज्यांची घरे आणि जमिनी गेल्या आहेत ते शेतकरी देखील रस्त्यावर येऊऩ आंदोलनं करीत आहेत.
4) या शिवाय पाणी टंचाईचाही मुद्दा निवडणूक प्रचाराचा भाग ठरू शकतो.जिल्हयात उन्हाळ्यात जवळपास 1200 खेडी,वाड्या आणि गावांना पाणी टंचाई जाणवते पण त्यावर अनेक वर्षात कायमस्वरूपी उपाय शोधला गेलेला नाही.या विषयावर उत्तरं देताना साऱ्याच उमेदवारांनी अडचण होणार आहे.
5) रायगड हा औद्योगिक जिल्हा असल्याने सातत्यानं होणाऱ्या अपघातांबरोबरच वाढती गुन्हेगारीचा मोठा उपद्रव रायगडला सहन करावा लागत आहे.
——————-
माहिती संकलन—शोभना देशमुख