रायगड प्रेस क्लबची वाचनीय ‘लेखणी’

0
660

रायगडला निसर्गाचं जसं वरदान लाभलेलं आहे तव्दच शौर्य आणि विद्वत्तेची देणगीही रायगडला लाभली आहे.आपल्या अलौकिक बुध्दीसामर्थ्य आणि शोर्याच्या बळावर रायगडच्या नावाचा दबदबा जगभर निर्माण कऱणारे अनेक महापुरूष रायगडनं देशाला दिले .रायगडला एक भारतरत्न,पाच पद्मविभूषण,चार पद्मभूषण,एक पद्मत्री,एक महाराष्ट्र भूषण,दोन मॅगेसेस,चार डी.लिट असे पुरस्कार मिळालेले आहेत.देश आणि राज्य स्तरावरील हे पुरस्कार मिळविणारा रायगड हा महाराष्ट्रातील तरी एकमेव जिल्हा असावा.पुरस्काराच्या या नामावलीवरूनच रायगडच्या कतृत्वाचा अंदाज आपणास येऊ शकतो.
रायगडच्या छोटया छोट्या गावातून आलेली ही सारी मोठी,क र्तृत्वान माणसं आज रायगडच्याच विस्मृतीत गेली आहेत हे खेदानं इथं नमुद करावं लागलंय.ज्या गावात ही नररत्न ेजन्मली त्या गावालाही आपल्या सुपुत्राचं विस्मरण झालंय.सरकारही महापुरूषांच्या स्मृती जतन करण्यासाठी विशेष काही करीत नाही.या पार्श्वभूमीवर रायगड प्रेस क्लबनं आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काढलेल्या स्मरणिकेत रायगडमधील तेरा महापुरूषांची सविस्तर आणि सचित्र माहिती दिली आहे.ही यादी तीसपर्यत असली तरी जागेअभावी ते शक्य झालेलं नाही.महपुरूषांच्या स्मृती जागविण्याचा हा छोटा प्रयत्नही नक्कीच कौतुकास्पद आहे.त्याबद्दल रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे आणि माजी अध्यक्ष विजय पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन.रायगडवर प्रेम असणा़ऱ्यांनी ही स्मरणिका जरूर पहावी.चाळावी,वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here