रायगड जिल्हयात यंदा 1 लाख 41 हजार 200 हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी होणार आहे.गत वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र जवळपास 18 हजार हेक्टरने जास्त आहे.गतवर्षी 1 लाख 23 हजार 397 हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती.यामध्ये भाताची लागवड सर्वाधिक म्हणजे 1 लाख 23 हजार 700 हेक्टरवर होत आहे.नागलीची लागवड 10 हजार 500 हेक्टरवर होणार आहे.तर तृणधान्यासाठी 4 हजार 600 हेक्टरचे क्षेत्र नक्की करण्यात आलं आहे.रायगड जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 6 लाख 86 हजार 892 हेक्टर असून त्यातील पिकांखालील निव्वळ पेरणी क्षेत्र 2 लाखांहून अधिक आहे.तर जंगल क्षेत्र 1 लाख 48 हजार 694 हेक्टर एवढे आहे.
जिल्हयातील वाढलेल्या लागवडीखालील क्षेत्रफळाचा विचार करून कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले आहे.जिल्हयासाठी महाबीज आणि अन्य खासगी बियाणे पुरवठादारांकडून 17 हजार 242 क्विंटल बियाणे आणि 30 हजार 943 मे.टन विविध प्रकारच्या खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे.जिल्हयातील शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारे अडवणूक वा फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथके तयार केली आहेत.