रायगडात 78 टक्के गुन्हयांची उकल

0
821

रायगडात 78 टक्के गुन्हयांची उकल

रायगड जिल्हयातील गुन्हयांची संख्या वाढत असली तरी त्यातील 78 टक्के गुन्हयांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.
रायगड जिल्हयात 2016 मध्ये 3हजार 216 गुन्हयांची नोंद झाली होती.त्यापैकी 78 टक्के म्हणजे 2 हजार 543 गुन्हयांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्रात 57 बलात्काराचे प्रकार घडले होते तसेच 111 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते.यातील बलात्काराच्या 56 तर विनयभंगाच्या 110 गुन्हयांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.2015 च्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराच्या घटनात 2016 मध्ये घट झाली.2015 मध्ये बलात्काराच्या 94 घटना घडल्या होत्या तर विनयभंगाचे 108 गुन्हे दाखल झाले होते.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here