रायगड जिल्हयातील दहा समुद्र किनार्यावर 25 जीवरक्षकांची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्यासाठी 69 लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत.
रायगड जिल्हयात 24 समुद्र किनारे आहेत.पैकी अलिबाग,मांडवा,किहिम,रेवदंडा,मुरूड जंजिरा,हरिहरेश्वर,आक्षी,नागाव,कोर्लई आदि किनार्यांवर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते.समुद्राची माहिती नसल्याने पोहण्यासाठी समुद्रात उतरलेले पर्यटक अनेकदा बुडून मृत्यूमुखी पडतात.अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर उपाय म्हणून 10 किनार्यावर जीवरक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच किनार्यावर धोकयाची सूचना देणारे फलक,वॉच टॉवर तसेच स्वच्छता राखण्यासाठी कचराकुंडया आदिंची व्यवस्था करण्यात येत आहे.नेमण्यात आलेल्या 25 जीवरक्षकांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे.हे जीवरक्षक लोकांना धोक्याची माहिती देतील तसेच कोणी पाण्यात बुडत असेल तर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतील.