वृत्तपत्रावर खादयपदार्थ खाऊ नका

0
845

रस्त्यावर विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेताना विक्रेता वृत्तपत्रातून आपल्याला पदार्थ देत असतो. मात्र हे पदार्थ आपल्या जीवावर बेतू शकतात. वृत्तपत्रासाठी वापरलेल्या शाईमुळे हे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. इतकेच नव्हे तर वृत्तपत्राच्या कागदामुळे कर्करोग होवू शकतो असा इशारा भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दिला आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सर्रासपणे वृत्तपत्राचा वापर होत असतो. त्याशिवाय घरात तेलात केलेले फराळ, खाद्यपदार्थ केल्यानंतर पदार्थातील तेल शोषण्यासाठी वृत्तपत्रात काढले जातात. पदार्थ बनवताना आरोग्याच्या दृष्टीने कितीही काळजी घेतली तरी हे वृत्तपत्रामुळे हे पदार्थ आरोग्यास हानीकारक ठरू शकतात. असे ‘एफएसएसआय’ने म्हटले आहे.

वृत्तपत्रांतील शाईमध्ये वापरण्यात येत असलेल्या केमिकलमुळे अन्नपदार्थ दूषित होतात. वृत्तपत्राच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईमध्ये हानीकारक रंगांचाही वापर केला जातो. त्याशिवाय वृत्तपत्राच्या कागदातही घातक घटक असतात. कागदाचा पुर्नवापर करुन तयार करण्यात आलेले कागद, कागदी बॉक्समध्येही विषारी रसायने आढळतात. यामुळे पचन संस्थेच्या आजार होण्याची शक्यता असल्याचे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे

वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे कर्करोगाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आधीच आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना अधिक होणार असल्याचेही ‘एफएसएसएआय’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

ग्राहकांनी विक्रेत्यांना वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ देणे बंद करण्यास सांगण्याबाबत आग्रह धरायला हवा असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

सर्व राज्यांमधील अन्नसुरक्षा आयुक्तांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ बांधून दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी आणि हा वापर थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश ‘एफएसएसएआय’ने दिले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here