रायगडात सेना स्वबळावर लढणार

0
764

रायगडमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व सातही जागा शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

शेकापचे जिल्हा परिषदेतील आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काल मुंबईतील सेना भवनात शिवसेनेत प्रवेश केला.त्यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते.
रायगडमध्ये गेली सात -आठ वर्षे शेकाप-शिवसेना युती आहे.मागील विधानसभा निवडणुका देखील शेकाप-सेनेेने एकत्र लढविल्या होत्या.मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने स्वतःचा उमेदवार उभा करून शिवसेनेची कोंडी केली होती.त्यामुळे शिवसेनेत नाराजी होती.शेकापबरोबरची युती तोडावी असा स्थानिक कार्यकर्त्यांचा नेतृत्वावरही दबाव होता.त्याला कोल उध्दव ठाकरे यांनी प्रतिसाद देत स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याची आणि लवकरच आपण रायगडमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली.
रायगड जिल्हा परिषदेत शेकाप-सेना युती आहे.या युतीवर उध्वव ठाकरे यांच्या निर्णयाचा काय परिणाम होतो हे लवकरच कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here