रायगडात सीआरझेडचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन

0
754

कोस्टल रेग्युलेटरी झोन अर्थात सीआरझेडचा मुद्दा सध्या मुंबईत वादाचा बनलेला असतानाच अलिबाग आणि मुरूड तालुक्यात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून समुद्राच्या काठावर 286 बेकायदा बांधकामे झाले असल्याचे समोर आले आहे.ही सारी बाधकामं मुंबईतील धनिकांची आहेत.जिल्हा प्रशासनाने मध्यंतर सीआरझेडचे उल्लंघन कऱणार्‍या मालकांच्या विरोधात धडक मोहिम उघडली होती.त्यानुसार दोन्ही तालुक्यात मिळून 156 मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले गेले होते.मात्र आता ही मोहिम थंडावली असून 130 बेकायदा बांधकामांना अभय मिळाले असल्याचे समोर आले आहे कारण गेल्या दोन महिन्यात सीआरझेडचे उल्लंघन कऱणार्‍यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.पर्यावरण संतुलन राखणे आणि सागरी संपत्तीचे जतन करण्यासाठी 1991मध्ये सीआरझेडचा कायदा देशभर लागू करण्यात आला पण रायगड जिल्हयात मात्र मोठ्या प्रमाणात सीआरझेड कायद्याकडे दुर्लक्ष करून बांधकामं झालेली आहेत..—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here