रायगडात सारेच बंडखोरीने बेजार

0
828

रायगडमधील सात विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काल 122 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने एकूण उमेदवारांची संख्या 173 एवढी झाली आहे.सर्वाधिक 32 उमेदवार पनवेलमध्ये तर त्या पाठोपाठ उरणमध्ये 27 उमेदवार आहेत.1 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार असून चिन्हाचे वाटपही त्याच दिवशी होईल.

उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी काल अनेकांनी एका पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळविल्याचे स्पषट्‌ झाले आहे.त्यात पेणमध्ये रामशेठ धरत सेनेतून भाजपमध्ये गेलेत,महेंद्र दळवी यांनी राष्ट्रावादीला सोडचिठ्‌टी देत अलिबागमधून सेनेकडून अर्ज दाखल केला आहे.ेसनेचा राजीनामा देत कृष्णा कोंबनाक यांनी भाजपकडून श्रीवर्धनमधून अर्ज भरला आहे.सेनेला सोडचिठ्‌टी देऊन संजय जांभळे यांनी पेणमधून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला आहे.तसेच राष्ट्रवादीचे राजीव साबळे यांनी श्रीवर्धनमधून अधिकृत उमेदवाराच्या विरोधात ंबंडखोरी केली आहे.कर्जतमध्ये सेनेचे हनुमंत पिंगळे यांच्या विरोधात बंडखोरी करीत महेंद्र थोरवे यांनीही शेकापकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.जिल्हयात सर्वत्र पंचरंगी लढती होतील.असे चित्र असले तरी पनवेलची लढत सर्वच पक्षांसाठी चुरशीची आणि प्रतिष्ठेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here