शुक्रवारी रात्री अमेरिकेत पोहोचलेल्या नरेंंंंंंंंंंंंंंंद्र मोदी याचं विमानतळावर दणक्यात स्वागत झालं असलं तरी अमेरिकेतील प्रसिध्द न्यूयॉर्क टाइम्स असेल किंवा वॉशिग्टन पोस्ट असेल किंवा अन्य माध्यमांनी मोदींच्या अमेरिका भेटीला फार महत्व दिलेलं दिसत नाही.काही वर्तमानपत्रांनी मोंदीची बातमी आतल्या पानावर छापली तर ज्यांनी ती पहिल्या पानावर दिली त्यांनी ती सिंगल कॉलममध्ये तळाला कुठेतरी दिली.शनिवारी त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदीतून केलेलं भाषण लक्षवेधी असलं आणि त्यांच्या या भाषणाने भारतीयांची मने जिंकली असली आणि भारतीय माध्यमांनी या भाषणाला मोठे कव्हरेज दिले असले तरी अमेरिकेत मात्र भाषणाला फार महत्व दिलं गेलं नसल्याचं तेथील वर्तमानपत्रांच्या इ आवृत्यावरून दिसतंय.
अमेरिकेला पोहोचण्यापुर्वीच नरेंद्र मोदी यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लेख लिहून आपण येत असल्याची जाणीव अमेरिकी जनतेला करून दिली होती.मात्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यापेक्षा अमेरिकेच्या एका कोर्टाने मोदींच्या विरोधात काढलेल्या वॉरंटची बातमी अनेक दैनिकात पहिल्या पानावर होती.वॉल स्ट्रीट जर्नल किंवा युएसए टु डेच्या वेबसाईटवरही भारताच्या पंतप्रधानाच्या दौऱ्याला प्राधान्य दिले गेले नव्हते.शिकागो ट्रिव्युनच्या वेबसाईटवरही मोदींच्या संदर्भात बातमी दिसत नव्हती.