रायगडात संततधार 

0
752
दीड दिवसांचे गणपती विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांना रविवारी आणि आज सोमवारी देखील पावसाने जबरदस्त तडाखा लगावला.शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाची रिपरिप आजही सुरूच आहे.त्यामुळे रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे.पावसामुळे जिल्हयातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पावसाने जिल्हयात अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. अलिबागनजिक कार्लेखिंडित दरड कोसळली मात्र रस्तयावरील अडथला बांधकाम खात्याने लगेच दूर केला.म्हसळा तालुक्यातील मजगाव खाडीत मच्छिमारी करण्यासाठी गेलेला एक मच्छिमार कालपासून बेपत्ता झाला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर काल रात्री उशिरा गोरेगावनजिक बस आणि व्हॅगनार यांच्यात झालेल्या धडकीत 2 जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अतिवृष्टीचा फटका सुपारी बागांना बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पाऊस लवकर थांबला नाही तर त्याचा फटका भातपिकांनाही बसू शकतो अशी भिती शेतकरी व्यक्त  करीत आहेत.
येत्या 48 तासात जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केल्यानं मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा बंदर विवभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here