Monday, June 14, 2021

रायगडात राष्ट्रवादीला खिंडार ?

अलिबाग   मॅन,मनी आणि मसल पॉवरने सशक्त असलेले अलिबाग तालुक्यातील महेंद्र दळवी हे सुनील तटकरे किंवा जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात हे माहित असल्यानंच अगोदर शेकापने आता राष्ट्रवादीने महेंद्र दळवी यांचे पंख छाटण्याचे काम केले आहे.मागच्या वेळेस शेकापने त्यांच्या पत्नी मानसी दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करतो असे सांगून ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला.आता राष्ट्रवादीने महेंद्र दळवी यांना कात्रजचा घाट दाखविला आहे.त्यामुळे संतप्प झालेल्या महेंद्र दळवी यांनी शिवसेनेची वाट धरली असून काल त्यांनी मातोश्रीवर जाऊन अलिबागची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले.स्थानिक पातळीवर शिवसेनेकडे प्रभावी उमेदवार नसल्याने महेंद्र दळवींना उमेदवारी मिळाली तर ते साऱ्यांनाच घाम फोडू शकतील अशी शक्यता आहे.येत्या दोन दिवसात याबाबतचा अंतिम निर्णय ते घेतील असे बोलले जाते.खरं तर 21 तारखेला त्यांनी कॉग्रेस भवनमध्ये जाऊन आपण मधू ठाकूर यांना मदत करू असे जाहीर केले होते.मात्र नंतरच्या या घडामोडींनी जिल्हयातील राजकारणाला नवी कलाटणी मिळणार आहे.आजच रामशेठ ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.
थळ जिल्हा परिषद मतदार संघ आणि अलिबागच्या अन्य काही भागात महेंद्र दळवी यांचा चांगलाच प्रभाव आहे.जयंत पाटील यांनी आपली सारी शक्तीपणाला लावल्यानंतरी ते आपले चिरंजीव नृपाल पाटील यांना महेंद्र दळवींच्या विरोधात निवडून आणू शकले नव्हते.नृपाल पाटील यांच्या विरोधात महेंद्र दळवी जवळपास अडिच हजार एवढ्या प्रचंड फरकाने विजयी झाले होते.तेव्हा पासून जयंत पाटील यांनी महेंद्र दळवी यांचा धसका घेतला असून राष्ट्रवादीबरोबर जिल्हा परिषदेत आघाडी करताना महेंद्र दळवी यांना अध्यक्ष करणार ऩसाल तरच तुम्हाला मदत करतो अशी अट त्यांनी सुनील तटकरे य़ांना घातली होती.सुनील तटकरे देखील महेंद्र दळवी याचं पक्षातील महत्व कमी करण्यासाठी उत्सुक होते त्यामुळे त्यांनी संधी मिळताच महेंद्र दळवी यांचे पंख कापल्याचे बोलल जाते.महेंद्र दळवी वाढू नये यासाठी सारेच नेते प्रयत्न करताना दिसत आहेत.

राजीव साबळेही नाराज
दक्षिण रायगडमधील एक प्रभावी नेते राजीव साबळे देखील नाराज आहेत.जिल्हा परिषद अध्यक्षपदासाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप असतानाही त्यांनी बंडखोर उमेदवार महेंद्र दळवी याना मतदान केले होते,त्यामुळेही तेही नाराज असल्याच ंसमोर आलेलं आहे.त्यांनाही पक्षाने सतत डावलत त्याचंही खच्चीकरणा केल्याची त्यांची भावना आहे.आता ते महेंद्र दळवी यांच्याबरोबर शिवसेनेत जातात की,अन्य काही भूमिका घेतात ते लवकरच कळणार आहे.मात्र रायगड राष्ट्रवादीत सारे अलबेल नाही हे या दोन्ही धटनांवरून दिसून आले आहे.मध्यंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस रोहयातच अवधूत तटकरे यांना आव्हान देण्यात आले होते मात्र सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर ते बंड थांबले होते.राष्ट्रवादीने शेकापबरोबर केलेली आघाडी दोन्ही पक्षातील अनेकांना मान्य नसल्याने त्याचे परिणाम विधानसभेत दिसून येतील अशीही चर्चा आहे,

Related Articles

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,982FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

राजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती

अ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...

पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव

आता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान  सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन   मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...
error: Content is protected !!