रायगडात राष्ट्रवादीला धक्का

0
710

रायगडमधील राष्ट्रवादीचे प्रतोद महेंद्र दळवी,जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे याच्यापाठोपाठ आता पक्षाचे संघटक प्रकाश देसाई यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने तो पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच्या कार्यशैलीवर आपण नाराज आहोत असं देसाई यांनी म्हटले आहे.रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शेकापबरोबर युती क ऱण्याचा निर्णय जिल्हयातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्याला आवडलेला नव्हता.त्याचे पडसाद आता उमटायला लागले आहेत.अलिबाग तसेच रोहा आणि कर्जत राष्ट्रवादीमध्ये देखील मोठी नाराजी असल्याने निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here