रायगड जिल्हयात आज सलग चौथ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळत आहे.अलिबागमध्ये पाऊस कमी असला तरी जिल्हयाच्या उत्तर भागात पावसाचा जोर अधिक आहे. माथेरानमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळत आहे.आज सकाळ संपलेल्या 48 तासात माथेरानमध्ये 180.0 मिली मिटर पाऊस कोसळल्याने तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे.पनवेल शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचले असून कर्जत,खोपोलीतही पाऊस पडत आहे.तुलनेत अलिबागला पावसाचा जोर कमी आहे.जिल्हयात सरासरी 85.50 मिली मिटर पाऊस झाला आहे.जिल्हयात आतापर्यत 1368 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.
काल जिल्हयातील नद्यांना आलेले महापूर आज कमी झाले असले तरी अंबा,कुंडलिका,पाताळगंगा,गाढी,उल्हास या नद्या दुथडी भरून वहात आहेत.