अरबी समुद्रात सातत्यानं निर्माण होणा़ऱ्या चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळावी आणि आपत्ती येण्यापुर्वीच त्यावर उपाययोजना करता यावी,तसेच आपत्तीच्या वेळी नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळ उपलब्ध करून देता यावे यासाठी रायगडसह पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील जिल्हयात राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी 550 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पासाठी जागतिक बॅकेचे सहाय्य मिळणार आहे.रायगड जिल्हयात पनवेल तालुक्यात विचुंबे,उरण तालुक्यात चाणजे,अलिबाग तालुक्यात किहिम,आणि गोंधळपाडा,मुरूड तालुक्यात मुरूड आणि हाफिजखार ,आणि श्रीवर्धन तालुक्यात खरसाई अशा नऊ ठिकाणी चक्री वादळ निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित कऱण्यात आले आहे.निवारा केंद्रासाठी समुद्र किनाऱ्या पासून 500 मीटर ते दीड किलो मीटरपर्यत किमान 25 गुंठे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्यात 50 बाय 50 मीटर निवारा केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे.या निवारा केंद्रात साडेपाचशे नागरिकांना सुरक्षित आसरा घेता येणार आहे.
सदरील प्रकल्पाअंतर्गत चक्री वादळ निवारा केंद्रं उभारणे,खार प्रतिबंध बंधारे बांधणे,जमिनी खालून विद्युत वाहिनी टाकणे,आणि राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना कऱणे इत्यादी कामं केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
शोभना देशमुख अलिबाग-रायगड