रायगडातही टायटॅनिक घडले होते..

0
964
महाराष्ट्रातील टायटॅनिक म्हणून महाराष्ट्रातील ज्या रामदास बोटीच्या अपघाताचा उल्ेलख केला जातो त्या दुर्घटनेला आज बरोबर 67 वर्षे झाली आहेत.17 जून 1947 रोजी बॉम्बे स्टीम नेव्हिएशन कंपनीची 408 वजनाची आणि इंग्लडच्या न्यू कॅसल इथं बांधलेली संत रामदास  बोट अलिबागच्या समुद्रात बुडाली या घटनेला आज 67 वर्षे झाली असली तर या अपघाताने रायगडच्या मनावर ओढलेल्या जखमा आजही कमी झालेल्या ऩाहीत.17 जुलै 1947 ची घटना.इंग्लंड येथील न्य कॅसल येथे बांधली संत रामदास ही तीन मजली मजबूत बोट जवळपास 700 प्रवासी घेऊन सकाळी आठ वाजता मुंबईहून अलिबाग तालुक्यातील रेवसकडं जायला निघाली.बोट निघाली तेव्हा पावसाळी हवामान होते आणि सर्वत्र धुके दाटून आलेलं होतं.पंरूत हे रोजचंच म्हणून त्याकडं दुर्लक्ष करीत बोटीनं आपला बारा मैलाची सागरी प्रवास सुरू केला.लाटां नेहमीपेक्षा जास्त जोरात उसळत होत्या.कप्तानाच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा कप्तानानं बोट पुढे न नेता काशाचा खडक टाळून नजिकच्या किनाऱ्याला लावण्याचे ठरविले.त्यांनी लाईफ जाकेट वाटायलाही सुरूवात केली होती.मात्र अचानक एक महाकाय लाट आली ती बोटीच्या डेकवरून गेली.दुसरी लाट आली ती बोट कलंडली आणि काशाच्या खडकावर जाऊन आदळली.बोटीला जलसमाधी मिळाली.बोटीतील 574 प्रवाश्याचा मृत्यू झाला.100-125 प्रवाशी पोहून किनाऱ्यावर लागले.त्याकाळी वायरलेस नसल्यानं सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती दुपारी 4 नंतर मुंबईत आणि रायगडात पोहोचली.तोपर्यत सारेच संपले होते. बातमीनं जिल्हयात हाहाःकार उडाला.या घटनेत पोहून काठावर आलेले अलिबागेत बारक्याशेठ मुकादम या घटनेच्या आठवणीनं आजही शोकाकूल होतात. ते आणि रायगडची जनता संत रामदास बोटीचा हा अपघात अजूनही विसरली नाहीत.या घटनेनंतर पावसाळ्यात मुंबई-रेवस या मार्गावरील बोट वाहतूक बंद करण्यात आली आहे. या  घटनेच्या अगोदर 1927 संत तुकाराम बोटही अशीच बुडाली होती.या दुर्घटनेवर आधारित एक मराठी दिग्दर्शक चित्रपट तयार करीत आहे.

शोभना देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here