जर्नालिस्ट वेलफेअर स्कीम, केंद्राची लवकरच योजना , पत्रकारांच्या एकजुटीचा विजय

0
695

महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि राज्यातील वयोवृध्द आणि निवृत्त पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी या मागण्यांसाठी आम्ही गेली पाच वर्षे राज्य सरकारकडे पाठपुरावा करतो आहोत .त्यासाठी मुख्यमंत्र्यांना तेरा वेळा भेटलो,आर.आर.पाटलांना 11 वेळा आणि अन्य मंत्री,इतर मान्यवरांची अनेकदा भेट घेतली.त्यासाठी रस्ता रोको,परनवेल ते वर्षा मोटर सायकल रॅली काढली,डीआयआयो कार्यालयांना घेराव घातले,नागपूर येथे आमरण उपोषणही केले,सनदशीर मार्गाने जे करता येईल ते सारं केलं पण महाराष्ट्राच्या मुर्दाड सरकाने पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांकडं अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे.याचा संताप आणि राग महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकाराच्या मनात आहेच आहे.
या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने पत्रकारांच्या हितासाठी काही निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे.त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो.माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यापुर्वी अनेकदा केंद्र सरकार पत्रकार संरक्षण कायदा करणार असल्याचे जाहीर केलेले आहे.मात्र बुधवारी त्यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने नेपत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांची नोंदणी करायला सुरूवात केली असल्याचे सांगितले.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे ( एनसीआरबी)ही नोंद ठेवली जाणार असल्याचे जावडेकरा यांनी सांगितले.(महाराष्ट्र सरकारकडे अशी कोणतीही नोंद नाही.माहितीच्या अधिकारात एक पत्र दिले गेले होते पण त्याला अशी माहिती उपलब्ध नाही असं उत्तर दिलं गेलं होतं.)आम्हाला वाटतं कायदा करण्याच्यादृष्टीने ही महत्वाची सुरूवात आहे.
वृध्द आणि निवृत्त पत्रकारांना दिलासा देणारी जर्नालिस्ट वेलफेअर स्कीम नावाची योजनाही लवकरच सरकार सुरू करीत आहे.या दोन्ही मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने 15 जून रोजी प्रकाश जावडेकरा यांची पुण्यात भेट घेण्यात आली होती.त्यानंतर पत्राद्वारेही त्याचा पाठपुरावा केला गेला होता आणि महाराष्ट्रात 15 जूनपर्यत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची सविस्तर माहितीही जावडेकरा यांना देण्यात आली होती.त्यानंतर हा निर्णय झाला आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या निर्णयाचे स्वागत करीत असून आता केंद्राने लवकरात लवकर हा कायदा क रावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  ीकेली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या या भूमिकेचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने स्वागत केले असून जावडेकरांना मेल पाठवून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून पत्रकारांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानेच सरकार हा निर्णय घेत आहे.हा महाराष्ट्रतील पत्रकारांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रथिक्रिया पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

( ही बातमी आपणास    http://www.smdeshmukh.blogspot.in/   येथून कॉपी करता येईल)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here