रायगडला लाल दिवा नाही

0
867

अलिबाग( प्रतिनिधी ) पंधरा वर्षे राज्याच्या मंत्रिमडळात महत्वाची खाती सांभाळणाऱ्या रायगडला नवीन सरकारात स्थान मिळण्याची शक्यता नाही,शिवसेना रत्नागिरीतून रामदास कदम आणि सिंधुदुर्गातून दीपक केसरकर यांना मंत्री करून नारायण राणे यांना शह देत असली तरी रायगडमधून मात्र सेनेने भरत गोगावले यांनी संधी दिलेली नाही.अगोदर तशी चर्चा होती.भाजपनेही प्रशांत ठाकूर यांना लाल दिवा देण्याची घोषणा केली होती.मात्र सध्याच्या विस्तारात तरी प्रशांत ठाकूर यांना संधी मिळताना दिसत नाही.भाजपने निष्ठावानांनाच संधी देण्याची ायोजना आखल्याने निवडणुकांपुर्वी काही दिवस भाजपमध्ये आलेल्यांना प्रतिक्षा करावी लागेल असे दिसते.अर्थात काहीही झाले तरी रायगडला मंत्री पद मिळत नसल्यानं जिल्हयात नाराजी आहे.जिल्हयात एकही मंत्री नाही ही गोष्ट राष्ट्रवादी आणि शेकापच्या पथ्यावर पडणारी नक्कीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here