रायगडला पाणी टंचाईच्या झळा

0
711

रायगड जिल्हयातील 32 गावं आणि 54 वाड्यांवर पाणी टंचाई जाणवत असून या गावांना 17 टॅन्कर्स मार्फत पाणी पुरवठा कऱण्यात येत आहे.जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरविण्यासाठी 6 कोटी 3 लाख रूपयांची तरतूद कऱण्यात आली आहे.
आगामी काळात जिल्हयातील 156 गावं आणि 347 वाड्या अशा तब्बल 503 ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवणार असून या गावंाना पाणी पुरविण्याचे नियोजनही करण्यात येत आहे.रस्यांची व्यवस्था नसल्यानं जिल्हयातील 13 गावं आणि 14 वाड्यांना बैलगाडीतून तर बेटावर असलेल्या 16 गावे आणि 17 वाड्यांना होड्यांमधून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.जिल्हयातील 23 गावांतील पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती केली गेली आहे.490 ठिकाणी विंधन विहिरीची कामे करण्यात आली असून त्यासाठी 3 कोटी 67 लाख 73 हजार रूपये खर्च कऱण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here