रायगडमध्ये 45,887 नवे मतदार

0
712

रायगड जिल्हयातील 22 लाख 1 हजार 326 मतदार आपला खासदार निवडण्यासाठी आता सज्ज आहेत.यामध्ये 10 लाख 80 हजार 513 महिला मतदार असून 11 लाख 19 हजार 743 पुरूष मतदार आहेत.सर्व्हिस मतदारांची संख्या 1057 आहे तर 10 मतदार एनआयआर आहेत.पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार एक हजार पुरूष मतदारांमागे 965 स्त्री मतदार असे आहे.जिल्हयात नुकतीच जी मतदार नोदणी झाली त्यानुसार 45 हजार 887 मतदार वाढले आहेत.यामध्ये स्त्री मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा जास्त आहे.24 हजार 872 महिला मतदार असून 21 हजार 16 पुरूष मतदार आहेत.फोटोसह नाव नोंदविलेल्या मतदारांची संख्या 20 लाख 96 हजार 599 एवढी असून ओळखपत्र असलेले मतदार 21 लाख 13 हजार 626 एवढे आहेत.जिल्हयातील हे मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडणार असून मतदार आपला कौल कोणाच्या बाजुने देतात हे निवडणुकीनंतर समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here