रायगडमध्ये हाय ऍलर्ट

0
928

रायगड जिल्हयात गेल्या तीनदिवसांपासून कमी अधिक पाऊस कोसळत असला तरी येत्या 48 तासात जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील नदी आणि खाडीकाठची 232 गावे आणि दरड कोसळण्याचा धोका असलेल्या 84 अशा एकूण 316 गावांना सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीनं देण्यात आल्या आहेत.कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्कालिन विभाग देखील सज्ज असल्याची माहिती आप्तकालिन विभागाचे सागर पाठक यांनी दिली.

जिल्हयात कोणतीही आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील ग्रामस्थाना तातडीने स्थलांतरीत करण्यासाठी नियोजन कऱण्यात आले असल्याची माहितीही पाठक यांनी दिली.दरम्यान काल रात्री जिल्हयात सर्वत्र चांगला पाऊस झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here