रायगडमध्ये सोयीनुसार युत्या-आघाडया 

0
664

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्थानिक गरज आणि परिस्थितीनुसार आघाडया आणि युत्या झाल्याचे दिसते.जिल्हयात शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.जिल्हयात शेकापने 32 तर राष्ट्रवादीने 29 उमेवार उभे केले आहेत.मतदार संघ 59 असल्यानें 14 ठिकाणी परस्परांच्या विरोधात हे पक्ष उभे असल्याचे चित्र आहे.सुनील तटकरे यांच्या कन्येच्या विरोधातही रोहयात शेकापनं उमेदवार उभा केला आहे.दुसरीकडं अलिबाग,पेण आणि कर्जतमध्ये शिवसेना – कॉग्रेस युती असली तरी उरण,श्रीवर्धन,पनवेल आणि रोहयात मात्र कॉग्रेस ,शेकाप आणि राष्ट्रवादीबरोबर आहे.महाड,पोलादपूर,माणगाव आणि म्हसळ्यात कॉग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने या तालुक्यात चौरंगी लढत अपेक्षित आहे.उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यानं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीने आदिती तटकरे,शेकापनं भावना पाटील आणि शिवसेनेने मानसी दळवी यांना उमेदवारी दिली आहे.या तीन महिला नेत्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असू शकतात.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here