खबरंय की रिलायन्सनं हिंदुस्थान टाइम्सची दिल्ली आवृत्ती विकत घेतली आहे.अजून दुजोरा मिळत नसला तरी मिन्ट आणि फ्लैगशीपनंतरचा हा सौदा झालाय.कोलकत्ता येथे याबाबतीच बोलणी झालीय.ती यशस्वी झाल्याची चर्चा दिल्लीतील मंडी हाऊस परिसरात आहे.रिलायन्सकडं अनेक चॅनल्स आहेत.आता रिलायन्स प्रिन्टमध्येही येऊ पाहतंय.असं झालं तर कर लो मिडिया मुठ्टीमेचं रिलायन्सचं स्वप्न साकार होणारंय.रिलायन्सनं हिंदुस्थान टाइम्सची दिल्ली आवृत्ती घेतलीय म्हटल्यावर स्वाभाविकपणे अन्य ग्रुपच्या पोटात गोळा आला आहे.कारण तसंच आहे.रिलायन्सनं जिओ लाँच करून मोफत मोबाईल सेवा दिली.त्याचा फटका अऩ्य कंपन्यांना मोठा बसलाय.त्याच पध्दतीनं रिलायन्स प्रिन्टमध्ये उतरले आणि त्यानं अंक मोफत देण्याची योजना आखली किंवा अन्य वेगळी स्कीप लॉच केली तर अन्य मध्यम आणि मोठी वर्तमानपत्रे ढेपालतील.त्यामुळं सारा मिडिया रिलायन्सच्या ताब्यात जाईल.
टाइम्स ग्रुप या चर्चेनं चांगलाच धास्तावलाय असंही बोललं जातंय.एखादी चांगली स्कीम रिलायन्सनं दिली तर त्याचा फटका सर्वाधिक टाइम्सला बसणार आहे.काहीजण असंही सांगू लागलेत की,रिलायन्सनं हिंदुस्थान समाचारही घेतलाय.मात्र त्याबाबतही दुजोरा मिळत नाही.एवढं मात्र नक्कीय की,रिलायन्सची प्रिन्टमध्ये एन्ट्री होतेय.टाइम्सनं नुकतंच एक संपादकीय लिहून अरण्यरूदन केलं होतं.मिडियाची अवस्था किती वाईट झालीय हे देखील सांगितलं होतं.आता हे गृहित धरून टाइम्सला रिलायन्सबरोबर स्पर्धा करावी लागेल.मिडियातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढली आहे.त्यामुळं नजिकच्या काळात नवे प्लेअर मिडियात येऊ शकतात.अर्थात हे सारं होतं असलं तरी मजिठिया आणि पत्रकारांच्या प्रश्‍नांबद्दल या नव्या प्लेअऱची भूमिका काय असणार हे दिसणार आहे.परंतू देशातील प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडिया एका ग्रुपच्या ताब्यात जाणं हे देशासाठी धोक्याचं आहे.रिलायन्सला सरकारचा पाठिंबा आहे हे वेगळ्ं सांगण्याची गरज नाही.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here