रायगडमध्ये सहकाराला घरघर

0
751

रायगड जिल्हयातील रोहा,पेण अर्बन बॅका बंद पडल्याचा फटका जिल्हयातील सहकार क्षेत्रालाच बसला असून अनेक सहकारी संस्थांवर टाळे लावण्याची वेळ आली आहे.जिल्हयातील तब्बल 42 पत संस्था बंद झाल्या आहेत 91 हौसिंग सोसायट्यांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.ग्राहक हिताचा विचार करून स्थापन झालेल्या 66 ग्राहक सहकारी संस्थाही काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत तर 115 औद्योगिक सहकारी संस्था इतिहास जमा झाल्या आहेत.बंद पडलेल्या इतर सहकारी संस्थाची संख्या 456 आहे.अशा प्रकारे जिल्हयातील एकूण 770 सहकारी संस्थांना कुलुप लागले आहे.रायगड जिल्हयातील सहकार क्षेत्राला लागलेली ही घरघर या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.कोकणात सहकार यशस्वी होत नाही या समजावर संस्था बंद पडत असल्याने शिक्कामोर्तब झाले आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here