अलिबाग- रायगड जिल्हा परिषदे शाळांच्या परिसरात शिक्षकांना मोबाईल बंदी घालण्याचा महत्वाचा निर्णय़ जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असून त्याचे जनतेकडून स्वागत होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील रोडावत जाणारी विद्यार्थी संख्या,ढासळत जाणारी शैक्षणिक गुणवत्ता,ज्ञानदान सोडून अन्य बाबींकडेच शिक्षकांचा असलेला कल,त्यामुळे खासगी शाळांना आलेली बरकत यावर जिल्हा परिषदेच्या बैठकीत सागोपांग चर्चा करण्यात आली.अनेक शिक्षक वर्गातच मोबाईलवर गप्पा मारत बसलेले असतात त्यामुळे त्यांचे शिक्षणाकडे लक्ष नसते अशी तक्रारही अनेक सदस्यांनी केल्यानंतर शिक्षकांनी शाळेच्या परिसरात मोबाईल वापरणास बंदी घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे यापुढे शिक्षकांना शाळेत मोबाईल वापरता येणार नाही.या नि र्णय़ाची अंबलबजावणी होते की,नाही याची तपासणी कऱण्यासाठी आणि शिक्षक आपले काम चोखपणे पार पाडतात की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी एक फ्लाईंग स्कॉड तयार करण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे होते.