रायगडमध्ये “वुमन पॉवर “

0
756

रायगड लोकसभा मतदार संघात पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्यानं जिल्हयातील महिला मतदार कोणत्या पक्षाला पसंती देतात ही बाब महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे.
रायगड मतदार संघात 7 लाख 70 हजार 543 महिला मतदार आहेत तर 7 लाख 43हजार 65 एवढे पुरूष मतदार आहेत. म्हणजे पुरूषांच्या तुलनेत महिलां मतदारांची संख्या 27478 ने जास्त आहे. महिला मतदार संख्येनं जास्त असतानाही जिल्हयात महिलांच्या प्रश्नांची सातत्यानं उपेक्षाच झाल्यानं महिलांमध्ये नाराजीची भावना दिसते आहे.
कोकणात 3500मी.मी एवढा विक्रमी पाऊस पडत असला तरी कोकणातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरत नाही. हा कळीचा मुद्दा ठऱणार आहे.पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करीत नाही ही महिलांची तक्रार आहे.महिलांना जिल्हयात बेकारीच्या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे.त्याबद्दलही नाराजी आहे.जिल्हयातील महिला सुरक्षित नाहीत ही कैफियतही अनेक महिलांनी बोलून दाखविली.गेल्या दोन वर्षात अनेक विवाहित आणि अविवाहित महिला जिल्हयातून बेपत्ता झाल्या पण अजून त्याचा तपास लागला नाही किंवा त्यासाठी कोणी विशेष प्रयत्न करतंय असंही दिसत नाही.नाराजी व्यक्त होताना दिसते आहे.जिल्हयात महिलांसाठीच्या शिक्षणाचा अभाव,किमन वेतनात पक्षपात,महागाई आणि गॅसचा तुटवडा ,अन्न सुरक्षा योजना सरकारनं राबविली असली तरी त्याचा लाभ तळागाळातील महिलांना होत नाही अशीही तक्रार केली जात आहे.अशा परिश्तितीत रायगड मधील महिला कोणत्या पक्षाला मदत करणार हा प्रश्न आहे.एक मात्र खरे की,जिल्हयात महिलाच विजयाच्या शिल्पकार ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here