रायगडमध्ये महिला अधिकारी राज

1
1169

कोकणात अनेक मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असली तरी महिलाना उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी कंजुषी दाखविली आहे. असे असले तरी किमान रायगडमध्ये तरी विधानसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याची महत्वाची आणि जोखीमभरी जबाबदारी महिला अधिका़ऱ्यांवरच असून त्या आपली जबाबदारी संमर्थपणे पार पाडताना दिसताहेत.महाड,पेण,श्रीवर्धन विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून महिला अधिकारीच काम पहात आहेत. आम्ही कोणाच्या मेहरबानीवर नव्हे तर बुध्दीमत्ता आणि कर्तुत्वाच्या बळावर आमची गुणवत्ता सिध्द करणार असल्याच्या भावना महिला वर्गात दिसत आहे.रायगडमध्ये महिला अधिकारी राज हा विषय चर्चेचा झाला आहे.
पेण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय़ अधिकारी म्हणून निधी चौधरी समर्थपणे काम पाहात आहेत.त्यांना मदत करीत आहेत पेणच्या तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय़ अधिकारी सुकेशिनी पगारे,महाड विधानसभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते,माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर असून त्यांना मदत करीत आहेत रोह्याच्या तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय़ अधिकारी उर्मिला पाटील महत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.निवडणूक गा़ऱ्हाणे नियंत्रण व मदत कक्ष प्रमुख म्हणून श्रध्दा सणस या काम पाहात आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here