पंधरा दिवस दडी मारलेल्या वरूणराजाचे काल रात्रीपासून रायगडमध्ये आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.आज सकाळपासून उरण,पनवेल,कजर्त ,परिसरात पाऊस पडतो आहे. अलिबागमध्ये सध्या रिमझिम पाऊस पडतो आहे. कजर्त खोपोली,खालापूर ,पेण परिसराला काल पावसाने झोडपून काढले.या पावसाने करपलेल्या रोपांना तर लगेच जीवदान मिळणार नाही पण आता पाऊस येऊ शकतो या जाणिवेनं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.रायगडमध्ये अनेक शेतकरी डोक्यावरून पाणी आणून रोपं जगवत आहेत.रायगड जिल्हयात १ जून ते १ जुलै या काळात केवळ १५१.८० मिली मिटर पाऊस झालाय तर आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्हयात १९.६७ मिली मिटर पावसाची नोंद झालीय.