रायगडमध्ये तहान लागल्यावर विहिरी

0
630

रायगड जिल्हयातील भीषण पाणी टंचाईशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 188 विंधन विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 88 लाख 36 हजार रूपयांचे तरतूद करण्यात आली आहे. जिल्हयातील पंधरा तालुक्यात 577 विंधन विहिरी खोदण्याचे टंचाई आराखडयात नक्की कऱण्यात आले होते मात्र पाण्याची गरज लक्षात घेऊन केवळ 188 विंधन विहिर खोदल्या जाणार आहेत.या विंधन विहिरींसाठी प्रत्येकी 47 हजार रूपये खर्च होणार असून विहिरी खोदण्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.मात्र तहान लागल्यावर विहिर खादण्याचा हा प्रकार हास्यास्पद असून फेब्रुवारीतच विहिरी घेतल्या गेल्या असत्यातर अनेक गांवांसमोरील पाणी प्रश्‍न सुटला असता अशी टीका आता केली जात आहे.जिल्हयात 434 गावे आणि 1433 वाड्या भीषण पाणी टंचाईशी मुकाबला करीत आहेत.

Click here to Reply, Reply to all, or Forward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here