रायगडमध्ये ‘विहिर स्वच्छता अभियान’

0
1279

रायगड जिल्हयातील पाणी टंचाईशी मुकाबला करणार्‍या 434 गावे आणि 1433 वाड्यांवरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे सरसावले असून प्रतिष्ठानच्यावतीने आजपासून जिल्हयात ‘विहिर स्वच्छता अभियान’ राबविले जाणार आहे.या योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि व्यक्तीगत स्वरूपाच्या 500वर विहिरीतील गाळ काढला जाणार आहे.जिल्हयातील बहुतेक विहिरी गेली अनेक वर्षे साफ केलेल्या नसल्याने त्यात गाळ मोठ्या प्रमाणात साचला असून त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक झरे बंद पडले आहेत.विहिरी स्वच्छ केल्यास झरे सुरू होतील आणि पाण्याची साठवण क्षमताही वाढेल असे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला वाटते.गेल्या वर्षी प्रतिष्टानच्यावतीने ठाणे जिल्हायत असाच प्रयोग कऱण्यात आला होता त्याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले.रायगड जिल्हयात विहिर स्वच्छता अभियान दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 250 विहिरी स्वच्छ केल्या जाणार आहेत.लोकसहभागातून होत असलेल्या या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here