रायगड लोकसभा मतदार संघातून भाजप-सेना युतीचे अनंत गीते २११० मतांनी विजयी झाले आहेत.अनंत गीते यांना ३,९६,१७८ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पधीर् राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना ३,९४,०६८ मते मिळाली आहेत.रायगडची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.पहिल्या फेरीपासूनच विजयाचे पारडे कधी गीते तर कधी तटकरे यांच्या बाजुने झुकत होते.अखेर२८ व्या फेरीअखेरीस अनंत गीते यांनी विजय संपादन केला.अनंत गीते रायगडचे विद्यमान खासदार आहेत.