रायगडमधील शेतकरी दुहेरी संकटात

0
788

युरोपीय देशांनी आब्यावरील आयात बंंदी उठविल्याने आनंदात असलेल्या कोकणातील हापूस उत्पादकांना आपला आनंद चिरकाळ टिकवता आलेला नाही.निसर्गानं शेतकऱ्यांच्या या आनंदावर विरजन टाकलं आहे.दोन दिवस कोकणात पडलेल्या पावसाने आब्यांची प्रतवारी खराब झाली असून निर्यातक्षम आब्यापैकी 40 टक्के आंबा युरोपीय देशात नाकारला जण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने कोकणातील आंबा उत्पादक अस्वस्थ आहेत.गेल्या वर्षी फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने युरोपीय देशांनी हापूस नाकारला होता.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
रायगड जिल्हयात आलेल्या अवकाळी पावसाने जिल्हयातील 1 हजार 516 गावातील 38 हजार 603 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.जिल्हयात 13 हजार 354 हेक्टरमध्ये आंबा घेतला जात असून त्यातील 7 हजार 588 हेक्टरमधील आंब्याचे नुकसान झाले आहे.पावसामुळे उत्पादनावर तर परिणाम होणार आहेच त्याचबरोबर निर्यातीवरही त्याचा परिणाम होणार असल्याने रायगडसह कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here